आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची चिंता मिटली:अकोला जिल्ह्यातील 10 लघु प्रकल्प ओव्हर फ्लो, 4 प्रकल्पांत 90 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या २४ लघु प्रकल्पांपैकी १० लघु प्रकल्प ओसंडून वाहात आहेत. तर, ४ लघु प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी प्रशासनाने लघु प्रकल्प परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शेकडो हेक्टर सिंचनाखाली

२४ लघु प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच, लघु प्रकल्पात जलसाठा उपलब्ध झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना पाझर फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे लघु प्रकल्पांसोबतच विहिरींच्या माध्यमातून शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. तुर्तास ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी पावसाने दांडी मारली असली तरी त्यामुळे पिकांना फायदा झाला आहे. तरी, दहा लघू प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. बार्शिटाकळी तालुक्यातील इसापूर, जनुना, घोटा, मोझरी, झोडगा, हातोला, पातूर तालुक्यातील गावंडगाव, पातूर, विश्वामित्री, मुर्तिजापूर तालुक्यातील वाई हे लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे या प्रकल्पा लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुबलक जलसाठा

बार्शिटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चां., पिंपळगाव हा., सावरखेड, पातूर तालुक्यातील तुळजापूर या चार लघु प्रकल्पांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यास हे प्रकल्प ओंसडून वाहण्याची शक्यता आहे.

प्रकल्पांतील जलसाठा

प्रकल्प - साठवण क्षमता - उपलब्ध साठा - टक्केवारी

- काटेपूर्णा - ८६.३५ - ७२.३९ दलघमी - ८३.७८ टक्के

- वान - ८१.९५ - ५५.७५ दलघमी - ६८.०२ टक्के

- मोर्णा - ४१.४६ - ३५.४६ दलघमी - ८५.५३ टक्के

- निर्गुणा - २८.८५ - २६.३१ दलघमी - ९१.२० टक्के

- उमा - ११.६८ - ९.७९ दलघमी - ८३.४८ टक्के

- दगड पारवा - ९.०१ दलघमी - ८८.४२ टक्के

बातम्या आणखी आहेत...