आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरभरा देताे, असे म्हणून चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आराेपीला शनिवारी िजल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. गाेपाल अरूण बाेदळे (वय २३. रा. हिरपूर, ता. मूर्तिजापूर) असे या आराेपीचे नाव आहे. १४ फेब्रुवारी २०१७ राेजी मूर्तिजापूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात पाच वर्षाच्या मुलीच्या आईने फिर्याद दिली हाेती. पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आराेपीने सायकलवर शेतात नेले.
तिला हरभरा देण्याचे सांगून शेतात नेले. याठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. तसेच धमकीही िदली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पी. जी. सोळंके यांनी तसास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले हाेते. सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली. सरकारकडून अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक काझी, पाेलिस नाईक नारायण शिंदे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.