आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विहिरीचा वाढदिवस:अकोल्यात विहिरीचा 100 वा वाढदिवस; केक कापून कृतज्ञता व्यक्त, पंगतीही उठल्या

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तयारी झाली.. दिवे-आरत्या लागल्या.. पाहुणे मंडळीही जमली.. नैवेद्य मांडला.. पूजन झाले.. केक कापला गेला आणि पंगतीही बसल्या. हा कार्यक्रम म्हणजे कुणाचं बारसं, लग्न नव्हतं तर चक्क विहिरीचा शंभरावा वाढदिवस होता. अकोला तालुक्यातील दहिगाव (गावंडे) येथील डाॅ. सुनीलकुमार गावंडे यांच्या घरी नुकताच विहिरीचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला. सुनीलकुमार यांचे आजी-आजोबा स्व. वालंबाबाई व जाणुजी पाटील गावंडे यांच्या काळात या विहिरीचे बांधकाम करण्यात आले. १ जानेवारी १९२१ रोजी विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यामुळे गावंडे परिवाराने वाढदिवस साजरा केला.

एकदाही आटली नाही : गावंडे कुटुंबीय म्हणाले, दहिगाव व परिसराने अनेकदा दुष्काळाचे चटके सोसले. भोवतालच्या विहिरी आटल्या. पण शंभर वर्षांत एकदाही ही विहीर आटली नाही. विहिरीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही शंभरावा वाढदिवस साजरा केला.

- सुमारे १०० फूट खोल असलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी ४० फूट आहे. विटा आणि चुन्याचे बांधकाम आहे.

बातम्या आणखी आहेत...