आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस सेवा:अकोला विभागात 107 बस धावताहेत रस्त्यावर; शेगाव, बुलडाणा, अमरावती मार्गावरही नियमित सेवा सुरू

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाच महिने झाले. त्यामुळे लालपरीची सेवा विस्कळीत झाली आहे. मात्र, काही कर्मचारी कामावर परत येत असल्यामुळे अकोला विभागामध्ये १०७ बस सध्या रस्त्यावर धावत आहेत. अकोला येथून अमरावती, बुलडाणा, शेगाव मार्गावरही नियमित बस सुरू झाल्या आहेत.

अकोला विभागामध्ये एकूण ९ आगार आहेत. यात सर्वाधिक गाड्या अकोला बसस्थानकावरून उपलब्ध आहेत. दिवसभरात जवळपास विभागात ३४९ फेऱ्या सोडण्यात येत आहेत. ज्याद्वारे एक लाखावर उत्पन्न विभागाला प्राप्त होत आहे. अकोला ग्रामीण आगारातून ३६ फेऱ्या, अकोला बसस्थानकावरून ६०, अकोटच्या फेऱ्या ५०, कारंजा ३५, मंगरूळपीर ४२, वाशीम ३७, रिसोड ३७, तेल्हारा २२, मूर्तिजापूर ३० फेऱ्या सुरू आहेत.अकोला विभागामध्ये एकूण अडीच हजारावर कर्मचारी कार्यरत आहे. त्यापैकी जपळपास २० टक्के कर्मचारी कामावर आहेत. अजूनही मोठ्या संख्येत कर्मचारी वर्ग संपावर आहे. त्यामुळे बससेवा पूर्ववर सुरू झालेली नाही. अकोला आगारात मंगळवारी ५ कर्मचारी कामावर रूजू झाले.

यामध्ये २ चालक, १ मेकॅनिक, १ वाहकाचा समावेश आहे. कर्मचारी कामावर परत येण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे बससंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...