आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:चोरीच्या घटनेतील 11‎ लाखांचा मुद्देमाल‎ तक्रारकर्त्यास केला परत‎

अकोला‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला शहरासह जिल्ह्यात‎ विविध चोरीच्या घटनेतील‎ मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत‎ करून तो तक्रारकर्त्यांना परत‎ करण्यात आला आहे.‎ फेब्रुवारीमध्ये ११ लाख १८ हजार‎ ६६० रूपयांचा मुद्देमाल परत केला‎ आहे. तत्कालिन पोलिस‎ अधीक्षक जी. श्रीधर यांच्या‎ कार्यकाळात हा उपक्रम सूरू‎ करण्यात आला होता. चोरीच्या‎ घटनेचा तपास करून चोरट्यांना‎ पकडल्यानंतर त्यांच्याकडून‎ चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात‎ येतो. ती रक्कम संबंधित‎ फिर्यादीला सन्मानपूर्वक परत‎ करावी व नागरिक आणि‎ पोलिसांमधील सलोखा कायम‎ राहावा, हा या उपक्रमामागचा हेतू‎ होता.

हीच मोहीम सध्याचे पोलिस‎ अधीक्षक संदीप घुगे यांनी कायम‎ पुढे सुरु ठेवली आहे. या मोहीमेत‎ आरोपींकडून सात वाहने त्यांची‎ किंमत ३ लाख ५० हजार रूपये,३‎ लाख ४६ हजार रूपये किंमतीचे‎ २९ मोबाइल, सोन्या- चांदीचे ३‎ लाख ४७ हजार रूपयांचे दागिने‎ व ७४ हजार ८५५ रूपयांचा इतर‎ मुद्देमाल परत केला.‎

बातम्या आणखी आहेत...