आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:1,126 लाभार्थ्यांच्या घराचा मार्ग मोकळा‎‎

अकोला‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेत मंजुर‎ लाभार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या‎ मार्गदर्शन मेळाव्यात ५७०‎ लाभार्थ्यांचे गुंठेवारी निमयानुकूल‎ करण्यात आले तर ५५६ लाभार्थ्यांचे‎ नकाशे मंजूर करण्यात आले.‎ यापैकी प्रत्यक्षात २२८ लाभार्थ्यांच्या‎ घरकुलाचे काम सुरु करण्यात‎ आला आहे. आयुक्त कविता द्विवेदी‎ यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात‎ आलेल्या या शिबिरामुळे हजारो‎ घरकुलांचा प्रश्न निकाली निघाला.‎ पंतप्रधान आवास योजनेत‎ गुंठेवारी प्लॉट धारकांचे २,९४०‎ घरकुले मंजुर करण्यात आली होती.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मात्र विविध कारणांनी या‎ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ‎ मिळताना अडचणी येत होत्या.‎ यातील मोठी अडचण होती,‎ गुंठेवारीचे नियमानुकुल करणे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ परिणामी घरकुल मंजुर होवून तीन‎ वर्षा नंतरही हा प्रश्न निकाली‎ निघाला नाही.

गुंठेवारीचे‎ नियमानुकुल सुरु करण्यात आल्या‎ नंतर लाभार्थ्यांना नेमकी कोणती‎ कागदपत्रे सादर करायची? याबाबत‎ माहिती नसल्याने हजारो लाभार्थी‎ लाभापासून वंचित होते. ही‎ महत्वाची बाब लक्षात घेवून‎ आयुक्त कविता द्विवेदी यांनी‎ घरकुल मंजुर लाभार्थ्यांसाठी‎ महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब‎ आंबेडकर सभागृहात मार्गदर्शन‎ मेळावा सुरु केला. या मेळाव्यात‎ नेमकी कोण-कोणती कागदपत्रे‎ लागणार? याची माहिती देण्यात‎ आली. तसेच लाभार्थ्यांना सर्व बाबी‎ समजून सांगण्यात आल्या. या‎ मेळाव्यात आयुक्तांनी पूर्णत:‎ उपस्थिती लावली. यामुळे‎ लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला‎ आहे.‎

एक हजार लाभार्थी सादर करु‎ शकले नाहीत कागदपत्रे‎
गुंठेवारीच्या २,९४० लाभार्थ्यांपैकी एक‎ हजार लाभार्थी अद्यापही कागदपत्रे सादर‎ करु शकलेले नाहीत. या लाभार्थ्यांना‎ कागदपत्रांची माहिती देवूनही कागदपत्रे‎ सादर न केल्याने या लाभार्थ्यांना‎ घरकुलापासून वंचित राहावे लागण्याची‎ शक्यता आहे. मात्र प्रशासनाने‎ लाभार्थ्यांसाठी सुरु केलेला मार्गदर्शन‎ मेळावा आणखी काही दिवस सुरु‎ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या‎ दरम्यान कागदपत्रे सादर केल्यास या‎ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळू‎ शकतो.‎

बातम्या आणखी आहेत...