आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचण्यांत वाढ करून खबरदारीच्या दिल्या सूचना:कोराेनाचे 115 अहवाल निगेटवि्ह; दोघांना डिस्चार्ज

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांमध्ये वाढ करून खबरदारीच्या सूचना जिल्हा यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने संदीग्ध रुग्ण आणि रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या कोविड चाचण्या करण्यात येत आहेत. रवविारी ११५ कोविड संसर्ग चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एकही रुग्ण बाधित आढळून आला नाही. त्यामुळे सध्या दिलासादायक स्थिती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माहितीनुसार दोन रुग्णांना रवविारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता सक्रिय रुग्णांची संख्या १३ झाली आहे. जिल्ह्यात एकूण पॉझिटवि्ह अहवालांची संख्या ६६०९६ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिलासादायक असली तरी संभाव्य संसर्गवाढीचा धोका लक्षात घेतला सुरक्षात्मक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण केले नाही. त्यांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन करण्यात आहे.

पाच दविसात काेराेनाचा एकही नवा रुग्ण नाही गेल्या पाच दविसात म्हणजे २८ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही, २७ डिसेंबर रोजी जिल्ह्यात कोरोनाचे चार बाधित रुग्ण आढळून आले होते.

बातम्या आणखी आहेत...