आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवास योजना:117 लाभार्थ्यांचे गुंठेवारीचे नियमानुकूल मंजूर ; विकास शुल्क न भरल्याने घरकुलाचे काम नाही

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेतील मंजूर घरकुलांपैकी गुंठेवारी पद्धतीच्या ११७ लाभार्थ्यांचे नियमानुकूलचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. मात्र लाभार्थ्यांनी विकास शुल्काचा भरणा न केल्याने घरकुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पंतप्रधान आवास योजनेत मंजुर झालेल्या घरकुलांपैकी २४०० लाभार्थ्याचे प्लॉट गुंठेवारी पद्धतीचे होते. त्यामुळे जोपर्यंत हे प्लॉट नियमानुकूल होत नाहीत. तोपर्यंत त्यांच्या घरकुलाचा नकाशा मंजूर करणे शक्य नव्हते. दरम्यान महापालिकेत २०१४ पासून गुंठेवारीचे नियमानुकूल बंद करण्यात आले होते. परिणामी या लाभार्थ्यांची घरकुले मंजूर होवूनही घरकुलाचे काम सुरू करता आले नाही.

अखेर राज्य शासनाने गुंठेवारी नियमानुकूल करण्यास मंजुरी दिल्यानंतर कोरोना काळ सुरु झाला. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने गुंठेवारीचे नियमानुकूलचे प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे. केवळ आवास योजनेतील घरकुलच नव्हे तर ज्या नागरिकांकडे गुंठेवारी पद्धतीचा प्लॉट आहे, त्यांनाही गुंठेवारीचे नियमानुकूल करता येत असल्याने ४०२ नागरिकांनी गुंठेवारीचे नियमानुकूलचे प्रस्ताव दाखल केले. हे सर्व प्रस्ताव मंजुर झाले. यात ११७ प्रस्ताव घरकुल लाभार्थ्यांचे आहेत. मात्र या लाभार्थ्यांनी अद्याप विकास शुल्काचा भरणा न केल्याने घरकुलाचे कामही सुरु झालेले नाही. जो पर्यंत विकास शुल्काचा भरणा केला जाणार नाही, तो पर्यंत घरकुलाचे कामही सुरु करता येणार नाही. तसेच २४०० गुंठेवारीच्या लाभार्थ्यांपैकी अद्याप हजारो लाभार्थ्यांनी गुंठेवारी नियमानुकूलचे प्रस्ताव दाखल केलेले नाहीत.

लाभार्थ्याची आर्थिक अडचण
गुंठेवारीचे नियमानुकूल झाल्यानंतर विकास शुल्काचा भरणा हा लाभार्थ्यांला करावा लागणार आहे. साधारणपणे ५ ते ६ हजार विकास शुल्काचा भरणा करावा लागणार आहे. या विकास शुल्काचा भरणा केल्यानंतर घरकुलाच्या पायाचा (प्लिंथ) खर्च प्रथम स्वत:ला करावा लागणार आहे. त्यानंतर प्लिंथसाठी केलेला खर्च लाभार्थ्याच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे लाभार्थ्याला हा दोन्ही खर्च करावा लागणार असल्याने गुंठेवारीचे नियमानुकूल मंजुर होवूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे लाभार्थ्यांनी विकास शुल्काचा भरणा केला नसल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...