आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठे आव्हान:मनपासमोर 117.49 कोटी थकीत मालमत्ता कर वसुलीचे आव्हान; 86 कोटी 51 लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालू आर्थिक वर्षात महापालिकेने थकीत तसेच चालू असा एकूण ८६ कोटी ५१ लाख रुपयाचा मालमत्ता कर वसूल केला. त्यामुळे २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ११७ कोटी ४९ लाख रुपयाचा थकीत मालमत्ता कर वसुलीचे आव्हान उभे आहे.

महापालिकेचे मालमत्ता कर हे उत्पन्नाचे महत्वाचे स्त्रोत आहे. महापालिका २००१ ला अस्तित्वात आली. मात्र महापालिकेने थेट २०१७ कर वाढ केली. या करवाढीला सर्व सामान्य नागरिकांनी जोरदार विरोध केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. अद्याप या प्रकरणाचा निकाल लागलेले नाही. महापालिकेने वाढवलेल्या करावर स्थगिती नसल्याने महापालिकेने कर वसुली सुरु ठेवली होती.

चालु आर्थिक वर्षात महापालिकेला १२७ कोटी ६६ लाख रुपये थकीत तर ७६ कोटी ६६लाख चालु आर्थिक वर्षातील कर असा एकुण २०४ कोटी ३३ लाख रुपयाच्या कर वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर होते. नियमानुसार थकीत करावर दरमहा २ टक्के या नुसार व्याज आकारले जाते. त्यामुळे ज्या नागरिकांनी एक वर्ष कराचा भरणा केला नसेल त्यांना २४ टक्के यानुसार व्याजाचा भरणा करावा लागणार होता.

दरम्यान या व्याजाचा भूर्दंड नागरिकांना बसु नये, यासाठी महापालिकेने वारंवार अभय योजना राबवून नागरिकांची व्याजातून मुक्तता करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही थकीत करापैकी केवळ ४९ कोटी ७१ लाख रुपयाचा कर वसूल झाला. तर चालु आर्थिक वर्षात ७६ कोटी ६६ लाख रुपयाच्या करापैकी ३६ कोटी ८० लाख रुपयाचा कर वसूल झाला.

बातम्या आणखी आहेत...