आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कुटुंबीयांना दिलासा:जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची 12 प्रकरणे मदतीसाठी पात्र

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजीपणासह इतर कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची १२ प्रकरणे सरकारी मदतीसाठी पात्र ठरली आहे. तसेच एका प्रकरण मात्र अपात्र ठरवण्यात आले आहे.

याबाबतचा िनर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी, घटते उत्पादन व वाढता उत्पादन खर्च , खासगी सावकार, वित्तीय संस्था, बँकेकडून घेतलेले कर्ज यासह इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्यात येते. संबंधित मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांचे प्रकरण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीत शेतकरी आत्महत्यांची एकूण १४ प्रकरणे ठेवण्यात आली.

त्यापैकी १२ प्रकरण मदतीसाठी पात्र जाहीर करत एक प्रकरण अपात्र तर एक प्रकरण फेरचौकशीसाठी ठेवण्यात आले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासह समितीचे इतर सदस्य, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.ही प्रकरणं ठरली पात्र : शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणं मदतीसाठी पात्र ठरली आहेत.

अशी आहे दाेन दशकातील माहिती
अनेक कारणांमुळे मशागत व पेरणीसाठीचा खर्चही प्राप्त हाेणाऱ्या उत्पन्नातून भागत नाही. परिणामी शेतकरी आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलताे. जिल्ह्यात जानेवारी २००१ ते नाेव्हेंबर २०२२ या कालावधीत २ हजार ७७९ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत करण्यात येते. िजल्ह्यात जानेवारी २००१ ते नाेव्हेंबर २०२२पर्यंत १ हजार ६२७ प्रकरणं मदतीसाठी पात्र; तर १ हजार ९६ प्रकरणांना अपात्र ठरवण्यात आले. उर्वरित प्रकरणांमध्ये चाैकशी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...