आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल:एकाच खोलीत राहतात 12 जण, रात्री अभ्यास करून घेतले 85%

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरकाम करून कुटुंब चालवणारी आई, खासगी बस बुकिंगचे काम करून महिन्याला जेमतेम चार हजार रुपये कमावणारे वडील. एकाच खाेलीत राहणारे १२ सदस्यांचे संयुक्त कुटुंब अशा वातावरणात येणाऱ्या अनंत आर्थिक अडचणींवर मात करत रोशनी दीपक मांडवेकर हिने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत ८५.६७ टक्के गुण मिळवले. ती श्री रालतो विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मांडवेकर कुटुंबीय कमला नेहरूनगर परिसरात राहतात. दीपक मांडवेकर यांचे विवाहित बंधू त्यांची मुले आणि दीपक यांचे आई-वडील व कुटुंबीय मिळून एकूण १२ सदस्य एकाच खाेलीत राहतात. त्यामुळे अभ्यासासाठी कधीच शांत वातावरण नसते. मी बारावीबरोबर नीटची तयारी करत असल्याने सर्वजण झोपल्यानंतर रात्री १० ते २ या वेळेत मी अभ्यास करायचे, असे रोशनी सांगते. पोट भरताना अडचणींचा सामना करावा लागला.

नीटच्या क्लाससाठी पैसे नाहीत
मला नीटचे क्लास करून डॉक्टर व्हायचे आहे. क्लास लावायला गेले, पण फी अावाक्याबाहेर. त्यामुळे मी एका अॅपच्या साहाय्याने तयारी करत आहे. अडचणी अनेकांना असतात. मात्र, खचून न जाता प्रयत्न करणे आपल्या हाती असते.'
- रोशनी मांडवेकर, गुणवंत विद्यार्थिनी

बातम्या आणखी आहेत...