आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीन ठेवायला जागा अपुरी:अकोला बाजार समितीत 3 दिवसात 12 हजार क्विंटल माल; खरेदीसाठी शेतकरी प्रतीक्षेत

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जागोजागी सोयाबीनचे पोते आवारात अंथरण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांना खरेदीसाठी तीन तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक पावसात सापडल्याने सोयाबीनची गुणवत्ता घसरली आहे. दुसरीकडे रब्बी हंगामाच्या पेरण्या तोंडावर आल्या आहेत. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांसह पडून शेतकर्यांच्या आशा वाढल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन विकून शेतकरी रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचे बियाणे घेत आहेत. त्यामुळे मिळेल त्या भावात सोयाबीन विकण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बाजार समितीत सोयाबीन ठेवण्यासाठी जागा नसल्याने दोन नोव्हेंबरला शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस आणू नका असेही कळविण्यात आले होते.

खोळंबलेली कामे मार्गी

जिल्ह्यात विविध तालुक्यांतील शेतशिवारात साचलेल्या पाण्यामुळे तसेच वेळेवर मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्यात काही भागात अद्यापही सोयाबीन सोंगणी आणि काढणीची कामे सुरू आहेत. दिवाळीतील आठवड्याभरात खोळंबलेली कामे पुन्हा मार्गी लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात सोयाबीनच्या मालात आणखी आवक होण्याची शक्यता आहे.

तीन दिवसातील सोयाबीनची आवक

1 नोव्हेंबर : 4477

2 नोव्हेंबर : 1451

3 नोव्हेंबर : 6875

सरासरी भाव पाच हजार रुपये क्विंटल

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत कमीत कमी 3 हजार 500 तर जास्तीत जास्त 5 हजार 565 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव गुरुवारी मिळाली. सरासरी भाव हा 5 हजार रुपये क्विंटल मिळाला.

विविध तालुक्यांतून आवक

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पातूर, तेल्हारा, बाळापूरसह विविध तालुक्यातून सोयाबीनची आवक होत आहे. दोन,चारशे रुपये अतिरिक्त भाव पदरात पडावा म्हणून शेतकरी शेतमाल घेऊन अकोल्यात येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...