आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक वाढली:तीन दिवसांत 12 हजार क्विंटल सोयाबीनची आवक

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन दिवसांत १२ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. जिल्ह्यात अजूनही सोयाबीन काढणीची कामे सुरू असल्याने येणाऱ्या आठवड्यात सोयाबीनच्या आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. जागोजागी सोयाबीनचे पोते आवारात अंथरण्यात आले आहेत. शेतकऱ्यांकडील माल ओला असल्याने बाजारात शेतमालाला ऊन दिले जात आहे.

रब्बी हंगामाच्या पेरण्या तोंडावर आल्यात. त्यामुळे सोयाबीन विकून शेतकरी रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचे बियाणे घेत आहेत. त्यामुळे मिळेल त्या भावात सोयाबीन विकण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. गेल्या तीन दिवसांपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सरासरी भाव पाच हजार रुपये क्विंटल
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत कमीत कमी ३ हजार ५००, तर जास्तीत जास्त ५ हजार ५६५ रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव गुरुवारी मिळाला. सरासरी भाव हा ५ हजार रुपये क्विंटल मिळाला.

बातम्या आणखी आहेत...