आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:पूर्व आणि पश्चिम झोनमधील 124 अवैध नळजोडण्या खंडित ; वैध करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पश्चिम झोन आणि पूर्व झोन अंतर्गत एकुण १२४ अवैध नळजोडण्यांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. दरम्यान नागरिकांनी आपल्या अवैध नळजोडण्या वैध करुन घ्याव्यात, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने शहरात अवैध नळजोडणी शोध मोहिम राबविण्यात येत आहे. अवैध नळजोडणी शोधल्या नंतर नळजोडणीचा पाणी पुरवठा खंडीत केला जात आहे. पश्चिम झोन मध्ये लोकमान्य नगर जलकुंभावरुन पाणी पुरवठा होणाऱ्या शिवसेना वसाहतीतील महापालिका शाळा क्रमांक १७ चा परिसर तसेच संतोष भास्कर यांच्या घराजवळील परिसरातील ५४ अवैध नळजोडण्यांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. तसेच पूर्व झोन अंतर्गत शिवनी परिसरात मागील चार दिवसात ७० अवैध नळजोडण्याचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. ही कारवाई मनपा झोन कंत्राटदार पुरुषोत्तम गुंडवाले यांच्या मार्फत कनिष्ठ अभियंता शैलेश चोपडे, तुषार टिकाईत, संदीप चिमनकर, विभागीय फिटर पद्माकर गवई, लोकमान्य नगर जलकुंभाचे फिटर सुधीर ढुके, संतोष पाचपोर, नागनाथ मोरे, धनराज पातोंड, गणेश घोडके आदींनी केली. दरम्यान ज्या नागरिकांकडे अवैध नळजोडण्या आहेत, त्यांनी नळजोडण्या वैध कराव्यात तसेच ज्या नागरिकांकडे पाणीपट्टी थकीत आहे, त्यांनी थकीत पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...