आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रुग्ण:कोरोना सक्रिय रुग्णात अकोला राज्यात चौथ्या स्थानी, पुणे जिल्ह्यात 125  रुग्ण

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आढळणाऱ्या कोविड रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला आहे. या रुग्णांमध्ये गर्भवती माताही बाधित आढळून येत आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्येत राज्यात चौथ्या स्थानावर आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात १२५, ठाण्यात ६८, मुंबईत ५८, अकोला जिल्ह्यात ३२ रुग्ण आहेत. अकोल्यात २६ नोव्हेंबरला एकाच दिवसात १७ रुग्ण आढळले होते. तत्पूर्वी १५ तारखेला ११ रुग्ण, १२ तारखेला ७ रुग्ण आढळले. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे दिसून येत असल्याने रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवल्याचे प्रशासनाने सांगितले.

दिवसाला १० ते २० चाचण्या, रुग्णांमध्ये सौम्स लक्षणे संदिग्ध महिलांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येतात. दिवसाला १० ते २० चाचण्या करण्यात येतात. यातून आठवड्याला विविध जिल्ह्यांतील सहा ते सात महिला बाधित आढळून येत आहेत. त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसून येतात, असे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...