आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:सरपंचपदाच्या 266 जागांसाठी 1325 अर्ज

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दुसऱ्यांदा थेट सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यत्वासाठीच्या निवडणुकीत एकूण ५ हजार ९८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या सरपंचाच्या २६६ पदांसाठी एक हजार ३२६ तर सदस्यच्या २ हजार ७४ जागांसाठी ४ हजार ६६० अर्ज प्राप्त झाले आहेत. आता सरपंच पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून काेण ‘क्षमतावान’ उमेदवार आहे, याची चाचपणी राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. यंदा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर वर्चस्व असलेली वंचित बहुजन आघाडी सरपंच पदाच्या निवडणुकीत थेट पक्ष म्हणून उतरणार असल्याने रंगत वाढणार आहे.

गत दाेन वर्षे काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी काही दिवस निर्बंध हाेते. तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रा. पं.च्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...