आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम विदर्भात साठवण क्षमतेच्या 80.24% जलसाठा उपलब्ध:27 मध्यम प्रकल्पापैकी 14 प्रकल्प 100%; मोठ्या प्रकल्पातही मुबलक जलसाठा

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भात साठवण क्षमतेच्या 80.24 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर 27 मध्यम प्रकल्पांपैकी 14 प्रकल्प 100 टक्के भरले असून मोठ्या प्रकल्पातही मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे.

प्रकल्पात 3108.77 घनमिटर साठवण क्षमता उपलब्ध

पश्चिम विदर्भात अकोला जिल्ह्यात दोन, अमरावती जिल्ह्यात एक, यवतमाळ तसेच बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येकी दोन असे एकूण 9 मोठे प्रकल्प आहेत. तर 27 मध्यम प्रकल्प आहेत. त्याच बरोबर 275 लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून 3108.77 दशलक्ष घनमिटर साठवण क्षमता उपलब्ध झाली आहे.

तर तुर्तास 2743.22 दशलक्ष घनमिटर (88.24 टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. यावर्षी जुन महिन्यात पावसाने दडी मारली मात्र जुलैच्या अखेरीस पश्चिम विदर्भात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्याच्या अखेरीस काही प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले. तर ऑगस्टच्या प्रारंभीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पश्चिम विदर्भात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला. जोरदार पावसामुळे काही भागातील शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झाले. मात्र मुबलक जलसाठ्यामुळे रबीच्या हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. दरम्यान तुर्तास मोठ्या प्रकल्पांपैकी चार तर मध्यम प्रकल्पांपैकी 18 प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

14 मध्यम प्रकल्प 100 टक्के

यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, मोर्णा, उमा. वाशिम जिल्ह्यातील सोनल, एकबुर्जी. बुलडाणा जिल्ह्यातील पलढग, मस, कोराडी, उतावळी हे 14 मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.

चार मोठ्या प्रकल्पातून विसर्ग

अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प अशा चार मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे उघडले असून यातून विसर्ग सुरु आहे.

प्रकल्पातील जलसाठा असा

- 9 मोठे प्रकल्प - 1271.13 दलघमी - 90.80 टक्के

- 27 मध्यम प्रकल्प - 635.62 दलघमी - 83.08 टक्के

- 275 लघु प्रकल्प -836.47 दलघमी - 88.63 टक्के

बातम्या आणखी आहेत...