आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी:मध्य रेल्वे द्वारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या

अकोला9 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

अशा आहेत गाड्या

३ स्पेशल नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ स्पेशल छ. शि. म. टर्मिनस मुंबई-दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर, २ स्पेशल गाड्या कलबुर्गी-छ. शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान, 2 स्पेशल गाड्या धावतील. सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावेल.

नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष

 • - विशेष गाडी क्र. 01262 नागपूरहून ४ डिसेंबर 23.55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 15.30 वाजता पोहोचेल.
 • - विशेष गाडी क्र. 01264, 5 डिसेंबर रोजी सकाळी 08.00 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी 23.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
 • - विशेष गाडी क्रमांक 01266, ५ डिसेंबर रोजी नागपूरहून 15.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता पोहोचेल.

मुंबई-दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर अनारक्षित विशेष

 • - विशेष गाडी क्र. 01249 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी 16.45 वाजता सुटेल आणि अजनीला दुसऱ्या दिवशी 09.30 वाजता पोहोचेल.
 • - विशेष गाडी क्र. 01251 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी 18.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.30 वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.
 • - विशेष गाडी क्रमांक 01253 दादर ७ डिसेंबर रोजी 00.40 वाजता मध्यरात्री सुटेल आणि त्याच दिवशी 15.55 वाजता अजनीला पोहोचेल.
 • - विशेष ट्रेन क्र. 01255 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ७ डिसेंबर रोजी 12.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.00 वाजता नागपूरला पोहोचेल.
 • - विशेष गाडी क्र. 01257 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ८ डिसेंबर रोजी 18.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.10 वाजता नागपूरला पोहोचेल.
 • - विशेष गाडी क्र. 01259 दादर ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री 00.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.55 वाजता अजनीला पोहोचेल.

अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष

 • - सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक 02040 अजनी येथून 7 डिसेंबर रोजी 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
बातम्या आणखी आहेत...