आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने एमआयडीसी परिसरात कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशाने भरलेली वाहने, काही पायी नेण्यात येणाऱ्या गोवंशांना ताब्यात घेतले. त्यात १५ गाई, बैल, गोरे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी हे वाहने व गोवंश एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणली. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करताना त्यांना खात्रीलायक माहिती मिळाली की बाभूळगाव ते कुंभारीकडे गाई, बैल, गोऱ्हे याना काहीजण संशयस्पद स्थितीत कत्तलीच्या उदेशने नेत आहेत. अशा माहितीवरून कुंभारी टी पॉईंट येथे नाकाबंदी करून आमच्याकडे येणारे काही व्यक्ती आणि जनावरांना थांबवून जनावर मालकी हक्काबाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिली. मालकी हक्काची कागदपत्रे त्यांनी सादर केली नाही .त्यावरून ही जनावरे चोरीची असावीत किंवा कत्तलीच्या उद्देशाने त्यांना नेण्यात येत असावे असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी जनावरे पोलिस ठाण्यात आणली. त्याची किंमत सात लाख आहे. त्यांना म्हैसपूरच्या आदर्श गोसेवा अनुसंधान प्रकल्पात पाठवले. प्राण्यांना क्रूरतेने निर्दयतेने वागवणे याप्रकरणी आरोपीविरुद्ध प्रतिबंधक कायदा कलम प्रमाणे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.