आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्क व्हा! जनावरांमध्ये वाढतोय लम्पी स्किन डिसीज:तज्ज्ञांनी सांगितली 15 महत्त्वाची लक्षणे

अकोला3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

जनावरांमधील लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील काही गावांमध्ये दिसून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत शेतकरी व पशुपालक यांना जागृत राहण्याचे आवाहन अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे प्रा. डॉ. सुनील वाघमारे आणि डॉ. धनंजय दिघे यांनी केले आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. अकोला जिल्ह्यातही शिरकाव झाला आहे.

रोगाची कारणे व प्रादुर्भाव

 • गोवंश आणि म्हैस वर्गात होणारा विषाणूजन्य, संसर्गजन्य त्वचारोग आहे.
 • या विषाणूचे शेळ्या मेढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साम्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही.
 • हा आजार जनावरांपासून मानवास होत नाही.
 • या आजाराची देशी वंशाच्या जनावरापेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याचे प्रमाण अधिक असते.
 • उष्ण आणि दमट हवामान रोगप्रसार होण्यास अधिक पोषक असते.

ही आहेत रोगाची लक्षणे

 • जनावराला मध्यम, काहीवेळा भयंकर ताप येणे.
 • जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते.
 • चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, दुग्ध उत्पादन कमी होते.
 • लसिकाग्रंथीना सूज येते.
 • जनावरांच्या शरीरावर 2 ते 5 सेमी व्यासाच्या कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात.
 • या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास इ. भागात येतात.
 • गाठी कित्येक महिने शरीरावर टिकून राहतात. गाठीमुळे पडलेले चट्टे शरीरावर बऱ्याच कालावधीकरिता अथवा कायमच राहू शकतात.
 • तसेच तोंडात, घशात आणि श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ आणि फोड येऊ शकते.
 • तोंडातील पूरळामुळे जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळत असते.
 • तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो.
 • पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.
 • डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येते तसेच डोळ्याची दृष्टी बाधित होते.
 • जनावरांना अशक्तपणा येतो आणि भूक मंदावते.
 • वजन कमी होते. या रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो.
 • प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह आजाराची बांधा पशूंमध्ये होऊ शकते.

असे होते निदान

लक्षणांवरून आजार ओळखता येत असला तरी या आजाराचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळे मार्फत केले जाते. याकरिता आजारी जनावरांचे रक्त, रक्तजल, त्वचा इत्यादी नमुने घेतले जातात.

बातम्या आणखी आहेत...