आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • 1500 Sq. Includes Properties With More Than A Foot Of Construction; 10 Per Cent Additional Tax Levied On Four And A Half Thousand Properties |marathi News

कर वसुली:1500 चौ. फुटांपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या मालमत्तांचा समावेश; साडेचार हजार मालमत्तांकडून 10 टक्के अतिरिक्त कराची आकारणी

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रातील ज्या मालमत्तांचे बांधकाम १५० चौरस मीटर, म्हणजेच १५०० चौरस फुटांपेक्षा अधिक आहे, अशा मालमत्तांवर करयोग्य मूल्याच्या १० टक्के अधिक कर वसूल केला जात आहे. शहरात अशा ४५०० मालमत्ता असून या मालमत्ताधारकांकडून मागील पाच वर्षाच्या कराची वसुली सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. महापालिका क्षेत्रात दीड लाखांपेक्षा अधिक इमारती आहेत. या इमारतीपैकी ४ हजार ५०० इमारतींचे बांधकाम १५०० चौरस फूट अथवा त्यापेक्षा जास्त आहे. अशा मालमत्तांचा कर शासनाकडे जमा करावा लागतो. अशा मालमत्तांनाही इतर मालमत्तांप्रमाणे कर आकारणी केली जाते. मात्र त्यावर दहा टक्के अधिक कराची आकारणी केली जाते. महापालिका मालमत्ता कर विभागाने मागील पाच वर्षाच्या कराची आकारणी करुन संबंधित मालमत्ताधारकांना देयके पाठवणे सुरू केले आहे. आतापर्यंत जवळपास ४०० मालमत्ताधारकांना या अनुषंगाने देयके पाठवण्यात आली आहेत. या अतिरिक्त मालमत्ता करामुळे संबंधित मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले असून, काही मालमत्ता- धारकांनी याबाबत मालमत्ता कर विभागात जाऊन चौकशी करुन आक्षेपही घेतला आहे.

असा आकारला जातो कर
संबंधित भागातील वार्षिक भाडेनुसार आलेल्या करयोग्य मूल्यावर विविध करांची आकारणी केली जाते. यात सामान्य कर, स्वच्छता कर, मलजलकर, रस्ता कर, अग्निशमन कर, शिक्षण कर, विशेष पाणीपट्टी, रोजगार हमीकर आदी आकारला जातो. ज्यांची मालमत्ता १५०० चौ. फुटांहून अधिक आहे. त्यांच्याकडून करयोग्य मूल्यांच्या १०% अतिरिक्त कर आकारला जातो.

फ्लॅट आणि व्यापारी संकुलाचा समावेश नाही
यात शहरातील फ्लॅट सिस्टिम तसेच व्यापारी संकुलाचे एकत्रित बांधकाम जरी १५०० चौरस फुटा पेक्षा अधिक असले तरी या इमारतींकडून अतिरिक्त दहा टक्के कर आकारला जात नाही. स्वतंत्र आणि १५०० चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकाम असणाऱ्या मालमत्तांवरच हा कर आकारला जातो.

मनपाला केवळ पाच टक्के रक्कम!
१५०० चौरस फूट अथवा त्यापेक्षा जास्त बांधकाम असलेल्या इमारतींचा कर वसूल करण्याचे काम महापालिकेला करावे लागते. मात्र वसूल केलेला हा कर शासनाकडे जमा करावा लागतो. महापालिकेने जेवढा कर वसूल केला असेल त्यावर पाच टक्के रक्कम महापालिकेला शासनाकडून दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...