आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचालु आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच्या अडिच महिन्यात १५ कोटी ४४ लाख ९७ हजारांचा मालमत्ता कर वसुल झाला. तर उर्वरित आर्थिक वर्षात १८६ कोटी ४९ लाख कर वसुलीचे आव्हान मनपासमोर उभे आहे. मनपाला चालु आर्थिक वर्षात १२१ कोटी ९८ लाख थकीत तर ७९ कोटी ९५ लाख चालु आर्थिक वर्षातील असा एकूण २०१ कोटी ९३ लाख मालमत्ता कर वसुली करावी लागणार आहे. एप्रिल ते १३ जूनपर्यंत थकीत मालमत्ता करापैकी ४ कोटी ८४ लाख ७५,३९७ रुपयाचा तर चालु आर्थिक वर्षातील १० कोटी ६० लाख २१,६०८ रुपये असा १५ कोटी ४४ लाख ९७,००५ रुपयाचा कर वसुल झाला. उर्वरित आर्थिक वर्षात मनपाला ११७ कोटी १३ लाख थकीत तर ६९ कोटी ३५ लाख चालु आर्थिक वर्षातील असा १८६ कोटी ४९ लाखाचा कर वसुल करावा लागणार आहे. जूनअखेर पर्यंत सामान्य करात ५ टक्के सुट ः एप्रिलमध्ये ज्यांनी चालु आर्थिक वर्षातील कराचा भरणा केला त्यांना सामान्य करात सात टक्के सुट देण्यात आली. तर आता मे महिन्यात कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना सहा टक्के आणि जुन मध्ये भरणा केल्यास सामान्य करात पाच टक्के सुट दिली जाणार आहे. थकीत करावर महिन्याकाठी दोन टक्के व्याज ः ज्या नागरिकांकडे कर थकीत आहे, त्यांना अधिक आर्थिक भुर्दंड बसू नये, यासाठी प्रशासनाने दरमहा दोन टक्के यानुसार आकारल्या जाणाऱ्या व्याजाच्या रकमेत २५ टक्के सुट दिली होती. मात्र ही सुट एप्रिल महिन्या पर्यंत सुरु होती. त्यामुळे आता थकीत कराचा भरणा केल्यास दरमहा दोन टक्के या नुसार व्याजाचा भरणा संबंधित थकीत मालमत्ता धारकांना करावा लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.