आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलस्त्रोत सर्वेक्षण:जिल्ह्यात 160 गावे जोखीमग्रस्त घोषित ; जलजन्य रोगाची शक्यता

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेकडून जलस्त्रोताच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात आले असून, जिल्ह्यातील १६० गावांवर ती जोखीमग्रस्त असल्याचे समोर आले.

नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी, पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र-राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. अनेक आजार हे अशुद्ध पाणी प्राशन केल्याने होतात. जलजन्य आजार होऊ नये, यासाठी जनजागृतीसह इतरही प्रयत्न होत असल्याचा दावा यंत्रणेकडून करण्यात येतो. मात्र अनेक ठिकाणी पुरवठा होणारे पाणी दूषित होते.

पावसाळा सुरू झाल्यानंतर तर व्हायरल फीवर, डेंगू, मलेरीया, चिकनगुनिया यासह जलजन्य व इतर साथरोग बळावतात. दरम्यान गत तीन वर्षात साथजन्य आजारांचा उद्भव झालेली गावे, नदीकाठावरील गावे, लाल कार्ड दिलेली गावे व पाणी टंचाई असलेली गावे यांची यादी तयार करण्यात आली आहेत. १६० गावे जोखीमग्रस्थ म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. साथरोग गावात उद्भवल्यास तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नियंत्रण कक्षही कार्यांन्वित ः जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीसाठी जिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. साथरोग नियंत्रण कक्षाचा क्रमांक 111आहे. ग्रामीण भागातून नियंत्रण कक्षाचा साथरोग व पूर परिस्थिती संबंधित माहिती किंवा संदेश नियंत्रण कक्षास प्राप्त होवून तातडीने प्रभावित ठिकाणी प्रतिबंधात्मक तथा उपचाराची कार्यवाही होईल.

औषधी किट्‍स उपलब्ध : प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणारी जोखीमग्रस्त गावे, पूर परिस्थितीची गावे, नदी काठावरील गावे व ग्रामपंचायतनिहाय सरपंच व ग्रामसेवक यांच्या अद्यावत संपर्क क्रमांकासह माहिती उपलब्ध ठेवण्यात आली आहे. साथरोग नियंत्रण कक्षात २१ प्रकारची अत्यावश्यक औषधी असलेली स्वतंत्र कीट्स उपलब्ध आहेत. तसेच जिल्हास्तरावर एक शीघ्र प्रतिसाद पथकही कार्यरत आहे.

बातम्या आणखी आहेत...