आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी‎ पाच दिवसांत 1,622 अर्ज‎

अकाेला‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण ‎अधिनियमांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये ‎ ‎ प्रवेशासाठी पाच दिवसात पालकांकडून १ हजार‎ ६२२ अर्ज करण्यात आले. प्रवेशासाठी‎ आॅनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा‎ झाला असून, १७ मार्चला रात्री १२ वाजतापर्यंत‎ अर्ज करता येणार आहे.‎ बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा ‎ ‎ अधिकार अधिनियमानुसार खासगी‎ विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५‎ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला,‎ मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.‎ आरटीईमुळे पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी‎ शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत‎ आहे. दरम्यान २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात‎ आरटीईअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठीची प्रक्रिया‎ सुरू झाली आहे. प्रथम शाळांची नाेंदणी आणि‎ आता आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १‎ मार्चपासून सुरू झाली आहे.‎

‎आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांच्या‎ नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र‎ प्रारंभी या नाेंदणी प्रक्रियेकडे काही‎ व्यवस्थापनातील शाळांनी फारसे लक्ष दिले‎ नाही. पाठपुरावा केल्यानंतर नाेंदणी प्रक्रियेला‎ वेग आला. नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत‎ १९० शाळांनी नोंदणी केली. संबंधित‎ शाळांमधील १ हजार ९४६ जागा‎ आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या‎ वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव‎ ठेवल्या आहेत.‎

...तर पुन्हा प्रयत्न करा‎
आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी‎ पालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अर्ज‎ करण्याची गती वाढतच असून, सर्व्हरच्या‎ क्षमतेपलीकडे जाऊन साईट स्लो हाेण्याची‎ शक्यता असते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात‎ न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा,‎ असे आवाहन करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...