आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पीमुळे 163 जनावरे दगावली:अकोट तालुक्यातील स्थिती, 1234 पशुरुग्ण अद्यापही सक्रीय

अकोला2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वाढलेल लम्पीचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान अकोट तालुक्यात अजूनही 1234 पशूरुग्ण सक्रीय आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 308 बाधित पशू आढळले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पशूंमधील लम्पी चर्मरोगाने अनेक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अकोट आणि तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लम्पी बाधित पशू आढळून आले आहेत. पंचायत समिती अकोट येथील पशुधन विकास अधिकारी यांच्या माहितीनुसार तालुक्यात सद्यस्थितीत लम्पीचा संसर्ग नियंत्रणात येत आहे. मोठ्या प्रमाणावर पशू उपचार घेऊन बरे होत आहेत. ज्या पशूंमध्ये गंभीर लक्षणे आहेत. त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेऊन उपचार केले जात आहेत.

अकोट तालुक्यातील स्थिती

 • लम्पीची लागण झालेले एकूण जनावरे : 3308
 • सक्रीय पशूरुग्णांची संख्या : 1234
 • आतापर्यंत दगावलेली जनावरे : 163
 • दगावलेल्या जनावरांमध्ये गाई : 93
 • दगावलेल्या जनावरांमध्ये बैल : 70

उपचारास प्रतिसाद

''अकोटमधील लम्पी चर्मरोगाचा संसर्ग नियंत्रणात येत आहे. अनेक पशू उपचाराला प्रतिसाद देऊन बरे होत आहेत. दुदैवाने आतापर्यंत एकूण 163 जनावरे दगावली आहेत.''- डॉ. प्रसाद खोडवे, पशुधन विकास अधिकारी, पं. स. अकोट

ही घ्यावी काळजी

 • जनावरांना मऊ आणि हिरवा चारा तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
 • हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे लंम्पी स्किन डिसीज सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
 • निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
 • बाधित आणि निरोगी जनावरे एकत्रित चरायला सोडू नये.
 • तसेच गायी आणि म्हशी एकत्र बांधू नये, म्हशींना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करावी.
 • बाधित परिसरात स्वच्छता करावी आणि निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
 • शेतकऱ्यांनी जनावरे हाताळल्यानंतर हात साबणच्या पाण्याने धुवून घ्यावेत किंवा सॅनिटायझरने साफ करून घ्यावे.
 • रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.
बातम्या आणखी आहेत...