आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाडाची तपासणी:मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या शिबिरात 175 युनिट रक्त संकलित

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिय मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिरात १७५ युनिट रक्ताचे संकलन झाले. याशिवाय यावेळी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात १२० रुग्णांची रक्तदाब, रक्तशर्करा, दमा, हृदयरोग, त्वचारोग, गुडघे दुःखी हाडाची तपासणी, वेरीकोज वेन आदीची तपासणी करण्यात आली.

यावेळी फिजियोथेरपीस्ट व आहारतज्ञ यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे उद्घाटन बालरोग तज्ञ डॉ. नरेंद्र राठी यांच्या हस्ते व प्रकल्प प्रमुख डॉ. संतोष सोमानी, डॉ. अनूप कोठारी, डॉ. आशीष पनपालिया, शरद चांडक, ब्रजेश तापड़िया, पंकज तापडिया यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिरात डॉ. तुषार चरखा, डॉ. अंबरीश खटोड, डॉ. अमित राजपाल, डॉ. प्रीति चरखा, डॉ. प्रतिक मोहता, डॉ. ईशा मोहता, डॉ. विद्याधर वनवे, आहार तज्ञ प्रज्ञा बरालिया आदींनी रुग्ण तपासणी केली. शिबिरात सीआरसी, आरबीसी, एचबीएलएफटी व ईसीजी करण्यात आले. तर डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या चमुनी रक्त संकलित केले. शिबिरात सुरेश राठी, द्वारका चांडक, विजय राठी, राजेश बिलाखिया, राजेश लोहिया, गुड्डू मल, राधेश्याम चांडक, डॉ. नरेश बजाज, शैलेश बियाणी, प्रकाश अलिमचंदानी, प्रकाश सारडा, महेश काकानी, मनोज पनपालिया, दीपक चांडक, प्रकाश पनपालिया, डॉ. संजय चांडक, प्रमोद मालपाणी, दिनेश पारेख, गोपाल चांडक, प्रमोद कचोलिया, रवी अग्रवाल, ऋषी पटेल, प्रणय भाटिया, स्वप्निल राठी आदींनी भेटी देऊन या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी डॉ. राठी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिव दिवेश शाह यांनी तर आभार अध्यक्ष पराग शाह यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...