आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसूली:मनपासमोर 179 कोटी 85 लाखांचे कर वसुलीचे आव्हान

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेसमोर १७९ कोटी ८५ लाख रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. चालू आर्थिक वर्षात केवळ २२ कोटी २७ लाख ८१ हजार १२१ रुपयांचा कर वसूल झाला आहे. त्यामुळे कर वसुलीवर वेतन तसेच विकासासाठी मनपाला पैसा खर्च करता येणार आहे.

महापालिकेचे मालमत्ता कर हा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे. चालू आर्थिक वर्षात मनपाला १२२ कोटी ७ लाख ७८ हजार ९७० रुपयाचा थकीत कर तसेच चालू आर्थिक वर्षातील ८० कोटी ५ लाख २८ हजार १०० रुपये असा एकुण २०२ कोटी १३ लाख ७ हजार ७० रुपयांच्या कर वसुलीचे आव्हान उभे ठाकले होते. आतापर्यंत मनपाने थकीत करापैकी ७ कोटी ७ लाख ७५ हजार २९७ रुपये, तर चालू आर्थिक वर्षाच्या करातील १५ कोटी २० लाख ५ हजार ९५९ रुपये असा एकुण २२ कोटी २७ लाख ८१ हजार १२१ रुपयांचा कर वसूल केला आहे. मनपाला थकीत करावर नियमानुसार दर महिना २ टक्के दराने व्याज आकारता येतो.

दरमहा दोन टक्के म्हणजेच वर्षाला २४ टक्के कर आकारता येतो. तर ज्या नागरिकांकडे दोन ते तीन वर्षाचा कर थकीत आहे. त्यांच्याकडून ४८ ते ७२ टक्के व्याज आकारले जाते. मात्र नागरिकांना थकीत करावरील व्याजाचा भूर्दंड बसू नये, यासाठी महापालिकेने अभय योजना राबवली. या अभय योजने अंतर्गत थकीत कराचा भरणा केल्यास व्याज माफ करण्यात आले होते. ही योजना जून महिन्यापर्यंत सुरू होती. मात्र तरीही केवळ ७ कोटी रुपयांचा कर वसूल झाला. आता थकीत करावर प्रशासनाला नियमानुसार व्याज आकारावा लागणार आहे. त्यामुळे थकीत कराचा भरणा करताना व्याजाचा भरणा नागरिकांना करावा लागणार आहे.

वेतन व विकास अवलंबून
कायमस्वरुपी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, मानसेवी आणि कंत्राटी कर्मचारी, शिक्षक यांच्या वेतनासाठी महापालिकेला महिन्याकाठी १० कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे मालमत्ता कराची अधिक वसुली झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच विकास कामांवर पैसा खर्च करता येतो. त्यामुळे नागरिकांनी थकीत तसेच चालू आर्थिक वर्षातील कराचा भरणा करून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...