आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:राज्य सबज्युनिअर अॅथलेटिक्स‎ चॅम्पियनशिपमध्ये सर्वस्वी प्रथम‎

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर येथे‎ आयोजित महाराष्ट्र राज्य सब‎ ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप‎ २०२३ मध्ये दहा वर्षाखालील‎ वयोगटात सर्वस्वी पुरुषोत्तम शेळके‎ हिने १०० मीटर व ५० मीटर प्रवर्गात‎ महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक‎ पटकावला आहे. ती बाल शिवाजी‎ प्राथमिक शाळा जठारपेठ येथे इयत्ता‎ चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने‎ कोल्हापूर येथे आयोजित स्पर्धेमध्ये‎ सूवर्णपदक प्राप्त केले.‎

यापूर्वी सर्वस्वीनी शालेय‎ स्पर्धांमध्ये हिवाळी स्पर्धा, मॅरेथॉन‎ स्पर्धा, जिल्हास्तरीय व विभागीय‎ स्तरीय अशा विविध स्पर्धांमध्ये‎ विजेतेपद प्राप्त केले आहे.‎ सर्वस्वीचे लक्ष राष्ट्रीय व‎ आंतरराष्ट्रीयस्तरावर नाव करणे‎ आहे. या यशाचे श्रेय ती शाळेतील‎ सर्व शिक्षक वृंद, आई-वडील,‎ आजी-आजोबा व इतर सर्व‎ सहकारी यांना देते. सर्वस्वीने जिल्हा‎ क्रीडा अधिकारी व अकोला जिल्हा‎ अॅथॅलेटिक असोसिएशन व क्रीडा‎ प्रशिक्षक यांचे आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...