आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्रूपा नदीत 2 लहान मुले बुडाली:अकोला जिल्ह्यातील मनब्दा येथील घटना; पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवला प्रसंग

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्रूपा नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा गावात आज दुपारी घटना घडली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, ऋषी संतोष सुरळकर (वय 13 वर्ष), सागर संतोष दांडगे (वय 13, रा. मनब्दा) अशी या दोन्ही मृत मुलांचे नावे आहेत. मृत मुले आज दुपारी विद्रूपा नदीकाठी गेली होते. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीच्या पाण्यात बुडाली आसावित असा प्राथमिक अंदाज आहे.

काय घडला नेमका प्रकार?

तेल्हारा तालुक्यातील मनब्दा गावातील ऋषीं संतोष सुरळकार, सागर संतोष दांडगे आणि पियूष आशिष तायडे हे तिघे जण मित्र आज रविवारी दुपारी गावातील विद्रूपा नदीत नदीकाठी गेले होते. यातील ऋषी आणि सागर आंघोळीसाठी नदीत उतरले, परंतू पाण्याचा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीच्या पाण्यात बुडाली. याची माहीती सोबत असलेल्या तिसऱ्या मित्राने गावकऱ्यांना दिले.

लागलीच मुन्ना पाथ्रीकरसह अन्य गावकरी नदीकाठी पोहचले अन् पाण्यात उड्या घेतल्या. बुडलेल्या दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत सागर आणि ऋषीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

कुटूंबाला मोठा धक्का

या घटनेची माहिती मिळताच तेलारा पोलिसांना मिळतात ज्ञानोबा फळ आणि पोलीस कर्मचारी संदीप तंडूलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांचेही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून याप्रकरणी स्थानिक पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहीती सुरळकर आणि दांडगे कुटुंबाला मिळताच त्यांना धक्का बसला. या घटनेनं मनब्दा गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...