आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदी जप्त:मुंबई - हावडा मेलमधून २ किलो सोने, 100 किलो चांदी जप्त

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला लोहमार्ग पोलिसांनी अकोला रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा मेलमधून दोन किलो सोना आणि सुमारे १०० किलो चांदी ताब्यात घेतली आहे. आंगडिया कुरिअर सर्विस’नें हे सोने-चांदी अकोल्यात आले आहे, आता हे सोनं-चांदी कुणाचे आहे या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तर जिल्ह्यातील सराफा व्यावसायिक रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाले असून, सोने-चांदीच्या संदर्भातील कागदपत्र पोलिस रात्री उशिरापर्यंत तपासत होते.

अकोला लोहमार्ग पोलिसांनी अकोला रेल्वे स्थानकावर ‘मुंबई हावडा मेल’ या रेल्वेत प्रवास करणाऱ्या शुभम नामक व्यक्ती जवळ जड बॅग दिसले, यादरम्यान रेल्वेत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला विचारणा केली. मात्र, त्याने बॅगेची तपासणीसाठी नकार दिल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय बळावल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मग त्याच्या बॅगेची झडती घेतली असता, पोलिसांना यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने अन् चांदी मिळून आली. पोलिसांनी या संदर्भात त्याला अधिक विचारणा केली असता त्याने आपण ‘आंगडिया कुरिअर सर्विस’चा काम करत असल्याचे सांगितले.

त्यानंतर सराफा व्यावसायिक पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी सोने आणि चांदी यांची तपासणी केली असता त्याचे वजन सुमारे २ किलो सोने आणि ९० ते १०० किलो चांदी असे भरले. सध्या पोलिसांनी या संदर्भात चौकशी सुरू केली आहे आणि संबंधित जीएसटी विभाग यासह इतर विभागांना माहिती दिली आहे. पोलिस आणि संबंधित विभाग हे सराफा व्यावसायिकाकडून सोने-चांदीचे बिलाचे कागदपत्र तपासत आहे. एवढे असूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...