आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून डांगी बैलांचा वापर डोंगर उतारावरील शेती मशागतसाठी करण्यात येतो. आदिवासी भागातील डोंगर उतारावरील शेती कसण्यासाठी डांगी प्रजातीचे बैल योग्य पर्याय ठरतात. त्यामुळेच या प्रजातीस आदिवासीबहुल भागातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. कळसूबाई शिखर पायथ्याशी यावर्षी पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय डांगी पशुधन प्रदर्शनाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या हस्ते उद्घाटनानंतर झाला.
बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे, अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, वासाळी (ता. इगतपुरी) गावचे सरपंच काशिनाथ कोरडे व परिसरातून अनेक नागरिक उपस्थित होते. डांगी जनावरांच्या या प्रदर्शनात सर्वात मोठी बोली लागलेली बैलजोडी २ लाखास विकली. अंदाजे ७० लाख रुपयांची उलाढाल या प्रदर्शनातून झाली.
डांगी पशुधन म्हणजे आदिवासीबहूल भागाचे वैभव. कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गसुंदर जहागीरदारवाडीत ग्रामदैवत कळसूआई यात्रेनिमित्त तीन दिवसीय डागी पशुधनाचे प्रदर्शन पार पडले. अकोले व इगतपुरी तालुक्यांच्या सीमेवर हे गाव असून डांगी जनावरांच्या व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आहे. बायफ संस्था पुरस्कृत समृद्ध किसान प्रकल्प व एएसके फाउंडेशन मुंबई, आमदार डॉ. किरण लहामटे, जहागीरदारवाडी ग्रामस्थ, गोविंदराव खाडे प्रतिष्ठान व कळसुबाई यात्रोत्सव समिती यांच्या संयुक्त संकल्पनेतून यावर्षी प्रथमच हे राज्यस्तरीय प्रदर्शन भरवण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील घोटी, इगतपुरी, सिन्नर व अकोले तालुक्यातून राजूर, कोतूळ, समशेरपूर भागातून मोठ्या प्रमाणावर डांगी जनावरे या प्रदर्शनात आणण्यात आली. शेतकऱ्यांना बायफच्या माध्यमातून अन्नातंगी पशुधन व्यवस्थापन व पैदास याविषयी तांत्रिक माहिती व्हावी व स्थानिक जैवविविधता संवर्धन यांचे महत्त्व समजावे यासाठी कळसूआई यात्रेनिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनात यशस्वितेसाठी बायफ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले. प्रदर्शनात आकर्षण ठरलेल्या गंभीरेवाडी येथील विठ्ठल सोमा गंभीरे यांच्या डांगी बैलजोडीचा प्रथम क्रमांक आला. ही बैलजोडी या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्य ठरली. तर बारी गावाचे गणेश तातळे यांचा ७० किलो वजनाचा अतिशय रुबाबदार आणि देखण्या बोकडाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सरपंच वैशाली खाडे, उपसरपंच चंद्रभान खाडे, पंढरीनाथ खाडे, हिरामण खाडे, रवींद्र खाडे, अंकुश करटुले, यशवंत खाडे तसेच शासकीय पशुसंवर्धन, आरोग्य, पोलिस, बायफ व वनविभागाकडून सहकार्य लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.