आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डम्पिंग ग्राऊंडवर उभारणार 2 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प:महापालिकेला मिळाले प्रदुषण नियंत्रणासाठी 1.30 कोटी रुपये

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वाढलेल्या प्रदुषणावर उपाय योजना करण्यासाठी शासनाकडून महापालिकेला १ कोटी 30 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. यातून डम्पिंग ग्राऊंडवर 2 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प अथवा शहरातील स्मशानभूमीत दहन वाहिका उभारण्याचे काम केले जाणार आहे.

शहरात वाढलेली लोकसंख्या, वाढलेली वाहनांची संख्या, कमी झालेले वृक्ष, पाण्याचा अपव्यय, वृक्षतोड, सतत होत असलेले कॉक्रीटीकरण, पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी सुरु असलेले तोकडे प्रयत्न, 50 मायक्रॉनपेक्षा कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांचा सुरु असलेला सर्रास वापर, सांडपाणी थेट नदीपात्रात सोडणे आदी विविध कारणामुळे नदीचे पाणी, हवा, वातावरण आदी सर्वच क्षेत्रात प्रदुषणात वाढ झाली आहे. त्यामुळे निसर्गही लहरी झाला आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तर दहा दिवसाचा पाऊस एकाच दिवसात हजेरी लावून जातो.

यामुळे निसर्ग चक्र विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रदुषणाला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरु आहेत. सांडपाणी थेट नदीत न सोडता, यावर प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत गटार योजना, शहरात ग्रिन स्पेस निर्माण करुन झांडाची संख्या वाढविणे आदी उपाय सुरु आहेत. शहरात भूमिगत गटार योजनेतील पहिल्या टप्प्याचे काम झाले आहे तर शहराच्या विविध भागात 21 ग्रिन स्पेस तयार करण्यात आले आहे. तसेच भूजलाची पातळी वाढावी, यासाठी 100 शोेष खड्डे तयार करण्यात आले आहे. तर आता शासनाकडून प्रदुषण नियंत्रणासाठी एक कोटी 30 लाख रुपये मिळाले आहेत. या निधीच्या खर्चाचे नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे.

दोन प्रकारे नियोजन

शहरात डम्पिंग ग्राऊंडवर कचरा संकलीत केला जातो. मात्र आता येत्या काही महिन्यात ही जागा रिकामी होणार आहे. डंम्पिंग ग्राऊंड भोड जवळ जाणार आहे. या जागेत 2 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र 1 कोटी 30 लाख रुपयात हा प्रकल्प उभारता येत नाही. त्यामुळे अन्य निधीतून या प्रकल्पात 70 -80 लाख वळते करता येतील का?याची चाचपणी सुरु आहे. जर हा प्रकल्प होवू शकला नाही तर शहरातील पाच स्मशानभूमित ईलेक्ट्रिक अथवा गॅसवर चालणारी दहन वाहीनी बसवण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र एका दहन वाहिनीसाठी 75 ते 80 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर दोन स्मशानभूमित दहन वाहिनी उभारण्याचाही प्रशासनाचा मानस आहे. या दोन पैकी एका प्रकल्पावर हा निधी खर्च केला जाणार आहे .

बातम्या आणखी आहेत...