आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पातूर ग्रामीण रुग्णालयासाठी 20 कोटी मंजूर; ग्रामस्थांना मिळणार दर्जेदार वैद्यकीय सेवा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर येथे उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता पातूर येथील ग्रामीण रुग्णालयातील २० कोटींचा निधी सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजूर केला आहे. पातूर येथील ३० खाटांच्या रुग्णालयासाठी हा निधी खर्च होणार असून, ही वास्तू तयार झाल्यानंतर ग्रामस्थांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा पातूर येथेच मिळणार आहेत.

पातूर व बाळापूर येथे उपजिल्हा रुग्णालय नसल्याने अत्यवस्थ रूग्णाला सुमारे ३० कि.मी. लांब असलेल्या अकोल्याशविाय पर्याय नव्हता. पातूर तालुक्यातील अनेक जण तर उपचारासाठी अकोल्याला येतात. दरम्यान पातूरचे ग्रामीण रूग्णालय सुज्ज असावे, येथेच वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. रुग्णालयासाठी निधी मिळावा, यासाठी शविसेनेचे आमदार िनतीन देशमुख यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. याबाबत बैठकाही झाल्या. अखेर ग्रामीण रुग्णालयासाठी २०६५ लाखाचा निधी मंगळवारी मंजूर करण्यात आला आहे.

वैद्यकीय अधीक्षकांसहअसेल पुरेसे मनुष्यबळ
प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी, परिचारिका एक, आरोग्य सहायक, सहायिका प्रत्येकी १, फार्मासिस्ट १ कार्यरत आहे. मात्र पातूर येथे ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर एक वैद्यकीय अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी, परिचारिका ७, वॉर्डबॉय-४, शिपाई-१, सफाई कर्मचारी-२, फार्मासिस्ट-१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-१, सहाय्यक-१ कार्यरत राहणार आहेत.

काय आहे आदेशात ?
पातूर येथे ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयासाठी मंजूर झालेल्या निधीतून इमारत बांधकामासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत. यात शवविच्छेदन गृह, स्वयंपाक घर, रुग्णवाहिका गॅरेज, विद्युतीकरण, पाणी पुरवठा मल:निस्सारण, आग प्रतिबंधक, फर्निचर, वातानुलीत यंत्रणेचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...