आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु प्रकल्प:अकोला जिल्ह्यामधील 24 पैकी 20 लघु प्रकल्प वाहताहेत ओसंडून

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या २४ पैकी २० लघु प्रकल्पांनी १०० टक्के पातळी गाठली आहे. तर उर्वरित प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि २४ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पामुळे अकोला शहरासह विविध गावांची तहान भागते. तसेच हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. जिल्ह्यातील लघु प्रकल्प ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. लघु प्रकल्पामुळे सिंचनासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागतो. त्यामुळे शहरवासीयांच्या नजरा जशा मोठ्या प्रकल्पांकडे असतात. तसेच ग्रामस्थांच्या नजरा या लघु प्रकल्पांकडे लागलेल्या असतात. या वर्षी जुलैअखेर आणि ऑगस्टच्या प्रारंभी झालेल्या जोरदार पावसामुळे लघु प्रकल्प ओसंडून वाहू लागले होते. तूर्तास काही प्रकल्पावरून विसर्ग सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने ओव्हरफ्लो कमी झाला आहे.

हे प्रकल्प १००% भरले बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चा., पिंपळगाव जहां., सावरखेड, इसापूर, जनुना, घोटा, मोझरी, झोडगा, मोऱ्हळ, हातोला. पातूर तालुक्यातील तुळजापूर, गावंडगाव, पातूर, विश्वामित्री. मूर्तिजापूर तालुक्यातील शिवणखुर्द, वाई. अकोट तालुक्यातील शहापूर बृहत, शहापूर लपा.

पश्चिम विदर्भात साठवण क्षमतेच्या ८३.१६ टक्के जलसाठा उपलब्ध अकोला पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम लघु प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे एकुण प्रकल्पाच्या साठवण क्षमतेच्या ८३.१६ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर मोठे, मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडले असून लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.

पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यात एकुण ९ मोठे, २७ मध्यम, तर २७५ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पामुळे ३१०८.७७ दलघमी साठवण क्षमता निर्माण झाली. तूर्तास २५८५.२४ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला. मोठ्या ९ प्रकल्पांपैकी ६, २७ मध्यम प्रकल्पांपैकी २१ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्याच बरोबर अनेक लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहे. यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने नदी, नाल्या काठच्या गावांना, वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...