आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१८ ते २५ वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे राज्यातील प्रमाण धक्कादायक आहे. मार्च महिन्यात २२०० मुली, म्हणजे रोज सरासरी ७० मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली असून यात सर्वाधिक १८ ते २० या वयोगटातील मुली आहेत. फेब्रुवारी महिन्यात १८१० तरुणी बेपत्ता असल्याच्या तक्रारी होत्या. हे प्रमाण दुसऱ्याच महिन्यात ३९०ने वाढले आहे. मुली, युवती व महिला घर सोडून जाण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे. त्यातही प्रेमप्रकरणातून आमिषाला बळी पडून जाणाऱ्या मुलींची संख्या अधिक आहे. बेपत्ता झालेल्या मुली जर अल्पवयीन असतील पोलिस अपहरणाची नोंद करतात. मुली अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख जाहीर केल्या जात नसल्याने अशांची स्वतंत्र नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावर नाही. सज्ञान मुलींच्या बेपत्ता झाल्याची नोंद मात्र पोलिसांच्या संकेतस्थळावर आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींचा या आकडेवारीमध्ये समावेश नाही.
याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रमाण चिंताजनक असून मिसिंग सेलने याबाबत कारणे शोधून उपाययोजना करण्याची गरज त्यांची प्रतिपादीत केली.
पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, अहमदनगरमध्ये सर्वाधिक प्रमाण
शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. मार्च महिन्यामध्ये पुणे २२८, नाशिक १६१, कोल्हापूर जिल्ह्यातून ११४, ठाणे १३३, अहमदनगरमधून १०१, जळगाव ८१, सांगली ८२, यवतमाळ ७४ युवती बेपत्ता झाल्याची राज्यातील सर्वात मोठी नोंद आहे. तर सर्वात कमी आकडेवारी हिंगोली - ३, सिंधूदुर्ग- ३, रत्नागिरी-१२, नंदूरबार -१४, भंडारा -१६ येथून मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे.
मार्च २०२२ मध्ये १६९५ मुली आजही बेपत्ता असल्याची नोंद
पोलिसांच्या तपासामध्ये ज्या बेपत्ता मुली, महिलांचा शोध घेतल्या जातो, तसतशी त्यांची नावे वगळण्यात येतात. आजही मार्च २०२२ मध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवर १६९५ मुली बेपत्ता आहेत. कागदोपत्री त्यांचा शोध सुरूच आहे!
बेपत्ता झालेल्या मुलींचे प्रमाण
जानेवारी २०२३ - १६००
फेब्रुवारी २०२३ - १८१०
मार्च २०२३ - २२००
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.