आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण:जिल्ह्यात 221 शिक्षक नवीन आले; 17 शिक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली

अकाेला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात २२१ शिक्षक नवीन आले, तर १७ शिक्षक हे जिल्ह्याबाहेर गेले आहेत. संबंधित शिक्षक रुजू होणार आहेत. गत दाेन वर्षे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही निर्बंध हाेते. परिणामी ग्रामविकास विभागाकडून शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली हाेती. मार्च २०२० ते शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. अखेर शिक्षण विभागाकडून या वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. राजकीय हस्तक्षेपाशिवाय शिक्षकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे व बदल्यातील निकष लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया राबवली. बदली प्रक्रियेत अकोला जि.प.तील १७ शिक्षक हे जिल्ह्याबाहेर गेले, २२१ शिक्षक अन्य जिल्ह्यातून अकाेल्यात आले आहेत.

१७ शिक्षकांचा मार्ग मोकळा ः परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांची चार-पाच वर्षे सेवा झाली की त्यांची नियुक्तीच्या ठिकाणी राहण्याची मानसिकता होते. त्यामुळे जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी फार कमी शिक्षक उत्सुक असतात. याच कारणामुळे यंदा १७ शिक्षक यंदा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून स्वगृही गेले. संबंधित शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश िज.प. प्रशासानाकडून जारी केले. .

रुजू हाेण्यास प्रारंभ
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत २२१ शिक्षक स्वगृही परतले असून यापैकी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून काही शिक्षक जिल्ह्यात रुजू झाले आहेत. उर्वरित २२० शिक्षक लवकरच रुजू होणार असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...