आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे दाखल:225  लिटर दारू जप्त; 6  आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

बार्शीटाकळी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांनी तालुक्यात सहा ठिकाणी कारवाई करून २२,५०० रुपयांची गावठी दारू जप्त केली. या कारवाईने अवैध गावठी दारू काढून विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी लोहगड येथे तीन ठिकाणी, राजनखेड येथे दोन ठिकाणी व कोथळी येथे एका ठिकाणी धाड टाकून एकूण २२,५०० रुपयांची दारू जप्त केली. या कारवाईत दारू काढण्याचे साहित्य नष्ट केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष राठोड, तुकाराम चव्हाण व गोवर्धन पवार (राहणार लोहगड), मीराबाई पवार, रोहिदास राठोड (राहणार राजनखेड) व लक्ष्मण चाफे (कोथळी) यांच्याकडून दारू पकडून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ही कारवाई बार्शीटाकळी ठाणेदार सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...