आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका प्रशासन अखेर दक्ष:अकोल्यात 23 अवैध नळजोडण्यांवर कारवाई; पण मोहीम अजूनही थंडबस्त्यात

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यातील पश्चिम झोन अंतर्गत म्हसोबा गल्ली भागात 23 अवैध नळजोडण्याचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी आपल्या अवैध नळजोडण्या वैध करून घ्याव्यात, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

शोध मोहीम थंडबस्त्यात

महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शहरात अवैध नळजोडणी शोध मोहीम सुरू आहे. अवैध नळजोडणी शोधल्या नंतर नळजोडणीचा पाणीपुरवठा खंडीत केला जात आहे. ही कारवाई पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोन निहाय सुरू आहे. मात्र, पश्चिम झोन वगळता अन्य झोनमध्ये अवैध नळजोडणी शोध मोहीम थंडबस्त्यात पडली आहे.

अन् कारवाई केली

पश्चिम झोनमध्ये लोकमान्य नगर जलकुंभावरून पाणीपुरवठा होणाऱ्या शिवसेना वसाहतीतील अंबिका चौक येथील चार इंची जलवाहिनीवरील 23 अवैध नळजोडण्याचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या जलवाहिनीवरुन अवैध नळजोडण्या घेण्यात आल्या. त्या जलवाहिनीचा पाणीपुरवठाच खंडीत करण्यात आला. ही कारवाई मनपा झोन कंत्राटदार संतोष ढगे यांच्या मार्फत कनिष्ठ अभियंता शैलेश चोपडे, तुषार टिकाईत, विभागीय फिटर पद्माकर गवई, लोकमान्य नगर जलकुंभाचे फिटर सुधीर ढुके, संतोष पाचपोर, नागनाथ मोरे, धनराज पातोंड, गणेश घोडके आदींनी केली.

दरम्यान ज्या नागरिकांकडे अवैध नळजोडण्या आहेत, त्यांनी नळजोडण्या वैध कराव्यात तसेच ज्या नागरिकांकडे पाणीपट्टी थकीत आहे, त्यांनी थकीत पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...