आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा पोलिस आस्थापनेवरील पोलिस शिपाई व चालकांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीपूर्वी उंची व छाती मोजणीत तब्बल २३५ उमेदवार अपात्र ठरले. अकोला जिल्हा पोलिस दलासाठी ३९ चालक व ३२७ पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी मैदानी चाचणीसाठी १५०० उमेदवारांना बोलवण्यात आले होते.
त्यापैकी एक हजार ६७ उमेदवार हजर झाले. सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या चाचणीत आधी उंची व छाती मोजणी करण्यात आली. त्यात २३५ उमेदवार अपात्र ठरले. त्यामुळे उर्वरित ८३२ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. शनिवार, ७ जानेवारी रोजी पुढील १५०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पोलिस मुख्यालयात हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.