आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षित:इतर मागासवर्गीयांसाठी 24 जागा; 91 पैकी 46 महिलांसाठी आरक्षित

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार, प्रमिलाताई ओक सभागृहात इतर मागासवर्गीय तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षणाची सोडत झाली. इतर मागासवर्गीयांसाठी २४ जागा आरक्षित करण्यात आल्या. यापैकी १२ जागा महिलांसाठी तर २५ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.

एकूण ३० प्रभागातून ९१ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून दिले जाणार असलेतरी प्रभाग क्रमांक ३० मधून चार नगरसेवक निवडून दिले जातील. यापूर्वी अनुसूचित जाती, जमातीसाठी आरक्षणाची सोडत झाली होती. हे आरक्षण कायम ठेवून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत झाली. मनपाच्या गुजराती शाळेतील चौथीतील सोहम भगत आणि पलंग ठाकूर यांच्याहस्ते आरक्षणाची सोडत काढली.

या सोडतीमुळे दिग्गज आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तर महिला आरक्षणामुळे विद्यमान नगरसेवकांना पत्नी अथवा आईला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यावेळी आयुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त जुम्मा प्यारेवाले, निवडणुक विभागप्रमुख अनिल बिडवे, संदीप गावंडे, कैलास ठाकूर आदी उपस्थित होते. दरम्यान, ३० जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर २ ऑगस्ट दुपारी तीनपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, हरकती व सूचनांची दखल घेतल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी प्रभाग निहाय अंतिम आरक्षण जाहीर जाईल.

बातम्या आणखी आहेत...