आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महापालिका निवडणूक:ओबीसींसाठी 24 जागा आरक्षित; त्यातील 12 जागा महिलांसाठी

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सूचने नुसार येथील प्रमिलाताई ओक सभागृहात इतर मागासवर्गीय तसेच सर्व साधारण महिलांसाठी आरक्षणाची सोडत घेण्यात आली. इतर मागासवर्गीयांसाठी 24 जागा आरक्षित करण्यात आल्या. यापैकी 12 जागा महिलांसाठी तसेच 25 जागा सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.

मागासवर्ग प्रवर्गासाठी सोडत

एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून दिले जाणार असले तरी प्रभाग क्रमांक 30 मधून चार नगरसेवक निवडून दिले जातील. यापूर्वी अनुसूचित जाती, जमातीसाठी आरक्षणाची सोडत घेण्यात आली होती. हे आरक्षण कायम ठेवून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत घेण्यात आली. या सोडतीमुळे अनेक दिग्गज समोरा-समोर येण्याची शक्यता आहे. तर महिला आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना पत्नी अथवा आईला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आरक्षण सोडतीला आयुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त जुम्मा प्यारेवाले, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, संदीप गावंडे, कैलास ठाकूर आदी उपस्थित होते.

एकूण जागांचा तपशील

प्रवर्गएकूण जागामहिलांसाठी आरक्षित
अनुसूचित जाती1508
अनुसूचित जमाती0201
ओबीसी2412
सर्व साधारण5025
बातम्या आणखी आहेत...