आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षीसप्ताह विशेष:कृषी विद्यापीठ परिसरात पक्ष्यांच्या २४० प्रजाती

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे वाढते शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे जंगलांचा ऱ्हास हाेत आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येताना दिसत आहेत. अशातच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात सुखद वातावरण पाहायला मिळते तब्बल २४० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती या परिसरात आढळत असल्याचे पक्षी सप्ताहानिमित्ताने पक्षी निरीक्षक व अभ्यासकांनी सांगितले.

वाढत्या नागरीकरणामुळे शहरात सिमेंटचे जंगल उभे होत असले तरी शहरालगत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. त्याठिकाणी माेठ्या प्रमाणावर जैवविविधता जाेपासलेली आहे. यामध्येच विविध प्रकारचे पक्षी लक्ष वेधून घेतात.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला सुमारे १,१५० हेक्टरहून अधिक परिसर लाभला आहे. या परिसरात घनदाट वृक्ष, विविध प्रकारच्या वेली, नाले, तलाव व लहान पाणवठे आहेत. पानथळ, गवताळ प्रदेश, दलदलीचा भाग या परिसराला काही प्रमाणात लाभला आहे. त्यामुळेच विद्यापीठात जैवविविधतेची समृद्धी पाहायला मिळते. पानथळ, गवताळ प्रदेशात आढळणारे, दलदलीच्या प्रदेशातील पक्षी, जंगलात आढळणारे पक्षी आदी विविध प्रकारातील सुमारे २४० प्रकारचे पक्षी येथे आढळतात. पक्षी अभ्यासक, निरीक्षक येथे विविध पक्ष्यांच्या नोंदी घेतात.

पक्ष्यांची सूची तयार केली
गेल्या काही वर्षांपासून मी कृषी विद्यापीठातील जैवविविधतेवर अभ्यास करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची नोंद घेतली असता अभ्यासाचा भाग म्हणून २४० पेक्षा अधिक पक्ष्यांची सूची तयार केली आहे. पक्षी वैभवासाठी हा भाग समृद्ध आणि श्रीमंत आहे. समीश धोंगळे, पक्षी अभ्यासक तथा विद्यार्थी वनविद्या शाखा.

हे पक्षी आढळतात
पक्षीमित्रांकडून पक्षी निरीक्षणाच्या माध्यमातून पक्षांच्या नोंदी घेतल्या जातात. मोर आणि बदकाचे विविध प्रकार मोठ्या प्रमाणात येथे आढळतात. याशिवाय हंस, घुबड, स्वर्गीय नर्तक, भारद्वाज, पोपट, कोकीळ, ठिपकेवाला नाचरा, साळुंखी, दयाळ, बुलबुल, खंड्या, हिरवट पर्णी वटवट्या, घार, बगडा, चातक, रंगीत करकोचा आदी अनेक पक्ष्यांच्या अधिवासामुळे येथील पक्षीवैभव संपन्न आहे.

बातम्या आणखी आहेत...