आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेकॉर्ड:25 महिने : 75 गुंड हद्दपार; कारवायांचे रेकॉर्ड मोडले

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता रहावी याकरिता गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अॅक्ट( महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायदा) नुसार २५ महिन्यात ७५ कुख्यात गुंडाना कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. ही कारवाई राज्याच्या तुलनेत अव्वल आहे. अकोला जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी आहे.

सोमवारी ७५ व्या गुन्हेगाराविरुद्ध पोलिसांनी ही कारवाई केली. डाबकी रोड रेणुकानगर परिसरातील कुख्यात गुंड संदीप उर्फ सॅन्डी त्रंबक भांडे (३०) याला एमपीडीए कायद्यांतर्गंत एक वर्षाकरता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून एमपीडीए अंतर्गत करण्यात आलेली ही ७५ वी कारवाई ठरली आहे.

भांडेवर यापूर्वी दंगा करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे, गंभीर दुखापत करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, सामान्य लोकांचे ररस्ता अडवून त्यांना शिवीगाळ करणे, अवैद्यरित्या शस्त्र बाळगणे, शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, लोकसेवक आपले कर्तव्यपार पाडत असताना त्यांचे कामात अडथळा करून त्यांच्यावर हल्ला करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी, दुखापत करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु तो प्रतिबंधक कारवाई करूनसुद्धा जुमानत नसल्याने त्याचे विरूद्ध गंभीर दखल घेण्यात येवून त्याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा, याकरता पोलिस अधीक्षकांनी त्यास स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता.

जिल्हादंडाधिकारी नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून त्यास एक वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश पारीत केला. संदीप उर्फ सॅन्डी त्रंबक भांडे याचा तत्काळ शोध घेवून त्यास जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांच्यामार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग, अकोला, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ मंगेश महल्ले यांनी तसेच डाबकी रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे, पो.स्टे.मधील कर्मचारी यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...