आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Akola
 • 25 Snakes Got Life Donation In Akola Environment Conservation Multipurpose Organization Initiative; 6 Nagas, 4 Ghonas Safely In Forest

अकोल्यात 25 सापांना मिळाले जीवनदान:पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम; 6 नाग, 4 घोणस सुरक्षितपणे जंगलात

अकोला7 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध परिसरात आढळलेल्या 25 सापांना सुरक्षित पकडून जीवनदान देण्यात आले. यामध्ये अनेक विषारी सापांचा समावेश होता. संस्थेचे सर्पमित्र कुमार सदांशिव, सुरज सदांशिव, प्रशांत नागे यांचासह अनेकांनी या कार्यात सहभाग घेतला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात सापांचा संचार वाढला असून संस्थेच्या वतीने दररोज सापांनी सुरक्षितरित्या ताब्यत घेऊन जंगलात सोडून देण्यात येते. घराच्या जवळील खुल्या जागेत, एमआयडीसी परिसर, शेतशिवार आदी विविध भागातून सर्पमित्र सापांना पकडून जंगलात सोडून देत आहेत. पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्रांनी विविध नागरी भागातून सापांना ताब्यात घेऊन जंगलात सोडले आहे.

या सापांना जंगलात सोडले

सर्पमित्रांनी जंगलात सोडलेल्या सापांमध्ये सहा नाग, चार घोणस, एक मण्यार, पाच धामण जातीचे, दोन तस्कर, चार कवड्या, एक कुकरी, एक नानेटी, एक दीवड या सापांचा समावेश होता, अशी माहिती संस्थेने दिली आहे. सर्पदंश टाळण्यासाठी सुरक्षित खबरदारी घ्यावी असे आवाहन संस्थेने केले आहे.

सर्पदंश झाल्यानंतर हे करा

दंशाच्या ठिकाणाहून दवाखान्यापर्यंत शक्य तितक्या लवकर पोहोचा.

रुग्णाला धीर द्या.

 • चुकीचे प्रथमोपचार - नस कापून घेणे टाळा.
 • रुग्णास कोणत्याही प्रकारची हालचाल करू देऊ नका.
 • कोणत्याही प्रकारच्या शस्त्राने जखम कापू नये/खराब करू नये.
 • मानसिक संतुलनही स्थिर ठेवावे, जास्त चिंताजनक वातावरण करू नये.
 • रुग्णास काहीही खाण्यास किंवा पिण्यास देऊ नये.
 • डॉक्टरांना उपचार सोईचे होण्यासाठी सापाची माहिती द्या.
बातम्या आणखी आहेत...