आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार मेळाव्यात 256 उमेदवारांचा सहभाग:पंडित दीनदयाळ उपाध्याय मेळावा; 52 जणांची प्राथमिक निवड; 86 पदांसाठी भरती प्रक्रिया

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 86 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रमुख पाच आस्थापनांनी सहभाग घेतला. भरती प्रक्रियेसाठी 256 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला तर निवड प्रक्रियेनंतर 52 जणांची प्राथमिक निवड झाली, अशी माहिती जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी दिली.

86 पदांच्या भरतीचे नियोजन

या रोजगार मेळाव्‍यात रॅलीज इंडिया लिमीटेड, एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण 10 पदे, लिबेन लाईफ सायंन्स प्रा.लि. एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण 15 पदे, गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट, अकोला यांनी एकूण 30 पदे, एम.एम.इंण्डस्ट्रिज प्रा.एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण 8 पदे, नमस्ते वेन्चर प्रा.लि.अकोला येथे एकूण 23 पदे असे एकूण 86 पदांच्या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे.

नियमित आयोजन

या मेळाव्यात जिल्ह्यातील 256 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्यात 52 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे दर महिन्याच्या आठ तारखेला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. उमेदवारांकरीता रोजगार मेळाव्यात ठिकाणीच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. दिवसेंदिस मेळाव्याला युवकांचा प्रतिसाद वाढत आहे. यामुळे कंपनीही मेळाव्याच्या प्रतिक्षेत असतात.

यांचाही सहभाग

यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा समन्वय शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे गजानन महल्ले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानाचे नरेंद्र काकड, गोपाल भाकरे, हर्षद भुरभुरे, मनोज वैद्य, जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...