आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा विविध कारणांमुळे कापसाला प्रतिक्विंटल अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. काही कापूस उत्पादक मात्र कमी भावावर तोडगा म्हणून सरकारच्या योजनेचा आधार घेत आहेत. अकोला तालुक्यात दोनवाडा येथील काही शेतकऱ्यांनी शासकीय प्रकल्पात सहभाग घेत कापसाच्या गाठी बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पहिल्या दोन ते तीन वेचणीचा २६० क्विंटल कापूस प्रकल्पासाठी दिला स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील दोनवाडा येथील अहिल्यादेवी होळकर कापूस उत्पादक गटामार्फत उत्पादित कापूस जिनिंग आणि प्रेसिंग करण्यासाठी पाठवण्यात आला. कापसावर प्रक्रिया करून त्याच्या गाठी तयार केल्या जाणार आहेत. जिल्ह्यात स्मार्ट कॉटन प्रकल्प राबवला जात आहे.
या प्रकल्पातून विविध भागातील शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनसाठी सहभाग घेतला. दोनवाडा भागातील अहिल्यादेवी होळकर गटाने उत्पादित केलेला कापूस आपातापा येथील जय गुरू जिनिंग प्रेसिंग येथे गाठी तयार करण्यासाठी आणण्यात आला. महाकॉट, पियायू व कृषी विभागाच्या सहकार्याने व्यापारी तत्त्वावर कापसाचे गाठींमध्ये मूल्यवर्धन करून थेट लाभ हस्तांतरित करत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनाने हा प्रकल्प सुरू केला. दोनवाडा येथील शेतकऱ्यांनी सहा शेतकऱ्यांनी नुकतेच सुमारे २६० क्विंटल कापूस आणला. यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) आरिफ शाह, उपविभागीय कृषी अधिकारी के. बी. खोत, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर, जिल्हा नोडल अधिकारी मनशी मनभेकर, मंडळ कृषी अधिकारी संदीप संखे, प्रदीप राऊत, सिनिअर ऑटर ग्रेटर महाकोट एम. बनचरे, कृषी पर्यवेक्षक सी. पी. नावकार, कृषी सहायक धर्मेंद्र राठोड, संतोष मुळे, संजय सावदेकर, अनिल वानखेडे, नीतेश घाटोळ, प्रणीत बंड आणि सरपंच श्रीकृष्ण पाटील झटाले, गटप्रवर्तक गोपालभाऊ बचे, शेतकरी विठ्ठल झटाले हरिदास बचे, भरत काळमेघ, विशाल पवार, उमेश बचे, शुभम जाधव आदी उपस्थित होते.
बाजारमूल्यापेक्षा अधिक दर मिळेल शेतकऱ्यांनी बाजारातील लांब धाग्याच्या कापूस वाणांची लागवड करत उत्पादन घेतले. या शेतकऱ्यांनी पहिल्या दोन ते तीन वेचणीचा कापूस दिला. प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात २६० क्विंटल कापूस आला आहे. आणखी काही शेतकरी येत्या काळात कापूस देणार आहेत. प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या गाठीची विक्री केली जाईल. शेतकऱ्यांना बाजार मूल्यापेक्षा अधिक दर यामुळे मिळू शकेल. - संतोष मुळे, कृषी सहायक, दोनवाडा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.