आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील कर्नाक रोड ओव्हर ब्रिज काढण्यासाठी २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वे मुंबई विभागातील अप-डाऊनमधील जवळपास ९० टक्के रेल्वे बंद राहणार आहेत. अकोला मार्गावरील गोंदिया, महाराष्ट्र, गितांजली, नागपूर दुरंतो, अमरावती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत.
मध्य रेल्वे मुंबई अप आणि डाउन धिम्या मार्गावर, अप आणि डाउन जलद मार्गांवर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मस्जिद स्टेशन दरम्यान रोड क्रेन वापरून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालित करणार आहे. यामुळे अप आणि डाउन धिम्या मार्गावर १९ नोव्हेंबरला रात्री ११ पासून ते २० नोव्हेंबरला ५ वाजेपर्यंत १७ तासांचा ब्लॉक असेल.
रिफंडसाठी व्यवस्था : प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख जंक्शन आणि स्टेशनवर पुरेसे परतावा खिडक्या (रिफंड काउंटर), प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत कक्षही सुरू करण्यात येणार आहे. चौकशीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देण्याचे आवाहन केले आहे. ब्लॉकमुळे होणाऱ्या ट्रेन्सच्या बदलांची प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले.
२० नोव्हेंबर
मुंबई - अमरावती एक्स्प्रेस
मुंबई - हावडा एक्स्प्रेस
मुंबई - निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस
मुंबई - हावडा दुरांतो एक्स्प्रेस
मुंबई - गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस
मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस
२१ नोव्हेंबर
मुंबई - हावडा एक्स्प्रेस
मुंबई - हावडा दुरांतो एक्स्प्रेस
मुंबई - गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस
मुंबई - नागपूर दुरांतो एक्स्प्रेस
मुंबई - हावडा मेल नागपूर मार्गे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.