आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदग्रहण सोहळ्याचे आयोजन:लायन्स क्लब ऑफ अकोला मिड टाऊनचा २७ वा पदग्रहण सोहळा

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लबस् इंटरनॅशनल अंतर्गत येणाऱ्या लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउनचा २७ वा पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी गृहमंत्री डॉ. रणजीत पाटील, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पुरुषोत्तम जयपुरिया, पी. डीजी. रमाकांत खेतान, हरीश अलीमचंदानी, जीएसटी कॉर्डिनेटर इंद्रपाल सिंग बग्गा, मुरलीधर उपाध्याय, अश्विनकुमार बाजोरिया, डिस्ट्रिक्ट जॉईंट ट्रेझरर राधेश्याम तिबडेवाल, झोन चेअरपर्सन मुकेश शर्मा, लिओ वासू अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडला.

अकोल्यामधील २६ वर्ष पूर्ण झालेल्या लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउन या महत्वपूर्ण क्लबच्या नवीन कार्यकारिणीने शपथ घेतली. यामध्ये अध्यक्षपदी प्रा. विवेक गावंडे, उपाध्यक्ष अनिता उपाध्याय, सचिव नितीनकुमार जोशी, कोषाध्यक्ष जितेंद्र जैन, सहसचिव मंगेश कक्कड, सहकोशाध्यक्ष स्वप्निल पंचगडे, बुलेटिन एडिटर सचिन शर्मा, टेमर रोमील मेहता, टेल ट्विस्टर आनंद राय यांनी शपथ घेतली. फेमिना क्लबच्या अध्यक्षपदी संध्या अग्रवाल, सचिव बबीता खंडेलवाल, कोषाध्यक्ष ममता अग्रवाल यांची निवड झाली तर अकोला सफायर क्लबचे अध्यक्ष ओम सावल, सचिव महेश्वरी देशमुख तर कोषाध्यक्षपदी संजय पुरी यांची निवड झाली. लाॅयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउन व फेमिना या दोन्ही क्लबच्या ऑर्थोपेडिक सर्विस बँकचेही उद्घाटन करण्यात आले.

तसेच गरजू चार दिव्यांगांना मिडटाउन क्लब व दोन दिव्यांगांना फेमिना क्लब तर्फे ट्रायसिकलचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच गरजू टीव्ही पेशंटला प्रोटीन पावडरचे आनंद राय यांचे मार्फत वितरण करण्यात आले. माजी गृहमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी क्लबने सुरू केलेल्या लॉयन्स अन्नछत्र साठी क्लबचे मुरलीधर उपाध्याय, मुकेश शर्मा, सुभाष चांडक व संतोष अग्रवाल व संपूर्ण क्लबचे कौतूक केले. यावेळी दयाराम रोहडा, प्रकाश आनंदानी, रवींद्र सिंग ओबेरॉय, विजयकुमार तोष्णीवाल, सचिन शर्मा, सुरेश खंडेलवाल, प्रकाश अलीमचंदानी, नंद अलीमचंदानी, महेश मनवानी. निर्मल आयदासानी. राजेश ठाकरे यांनी सेक्रेटरी रिपोर्ट प्रस्तुत केला ध्वजवंदना घनश्याम जोशी यांनी, संचालन स्वाती झुनझुनवाला तर आभार प्रदर्शन डॉ. हेमंत जोशी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...