आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक नविडणूक:सरपंचपद 28, सदस्यपदासाठी 128 अर्ज

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सात, बाळापूर तालुक्यातील एक अशा आठ ग्रा.पं.च्या सदस्य व सरपंचपदांच्या सार्वत्रिक नविडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दविसाअखेर सरपंचपदासाठी २८, सदस्य पदासाठी १२८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्य नविडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रा. पं.मध्ये नविडणुकीची प्रक्रिया राबवत आहे. जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रा.पं.ंच्या, नव्याने स्थापित ग्रा.पं.च्या सदस्य पदासह सरपंचपदाच्या सार्वत्रिक नविडणूक कार्यक्रम घोषित झाला.

अकोट तालुक्यात पोपटखेड, धारगड, धारुर रामापूर, अमोना, सोमठाणा, कासोद शविपूर व गुल्लरघाट अशा सात ग्रा.पं. तर बाळापूर तालुक्यातील व्याळा ग्रामपंचायत अशा एकूण आठ ग्रामपंचायसाठी सार्वत्रिक नविडणूक होणार आहे. त्यानुसार इच्छुकांनी २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल केली. संबंधित अर्जांची छाननी तालुका स्तरावर करण्यात येणार आहे. नविडणूक कार्यक्रमानुसार संबंधित ग्रामपंचायतींसाठी मतदान रवविार १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी व निकाल घोषित करणे सोमवार १९ सप्टेंबर २०२२ रोजी होईल.

बातम्या आणखी आहेत...