आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात आधार जोडणी शिबिर:28 हजार मतदारांनी केली नोंदणी; सर्व मतदान केंद्रांवर होती सुविधा

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील पाच मतदान संघातील 28 हजार 292 मतदारांचे आधार जोडण्याकरीता (नमुना 6 बी) नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत.

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम 1 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया होणार आहे. त्याचप्रमाणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघाचे नाव एकापेक्षा जास्त वेळा नोंदविले गेले किंवा कसे, याचा पडताळा करण्यासाठी याची मदत होणार आहे. विद्यमान मतदारांनी नमुना अर्ज क्रमांक 'सहा ब'मध्ये आधार क्रमांक मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करावयाचा आहे. तसेच व्होटर हेल्प लाईन ऍप व https://nvsp.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे ही मतदार आपला आधार क्रमांक नोंदवू शकतात, असे निवडणूक िवभागाकडून कळविण्यात आले आहे.

या मतदान केंद्रावर झाली नोंदणी

शिबिरामध्ये मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी प्राप्त नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत. यात अकोट मतदार संघात 2 हजार 410, बाळापूर येथे 10 हजार 481, अकोला पश्चिम येथे 1 हजार 693, अकोला पूर्व येथे 4 हजार 997 व मूर्तिजापूर येथे 8 हजार 711 असे एकूण 1 हजार 680 मतदान केंद्रावर 28 हजार 282 मतदारांचे नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहे, असे , अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी कळवले आहे.

अशी झाली नोंदणी

जिल्ह्यातील मतदारांचे नमुना 6 बी नोंदणीसाठी मतदारसंघनिहाय अर्ज प्राप्त झाले आहेत. यात अकोट येथे 32 हजार 840, बाळापूर येथे 80 हजार 731, अकोला पश्चिम येथे 5 हजार 419, अकोला पश्चिम येथे 10 हजार 685 व मूर्तिजापूर येथे 76 हजार 445 असे एकूण 2 लाख 6 हजार 120 मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...